निपुण भारत
अध्ययन स्तर निश्चिती
उद्दिष्ट्येः
- सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा भाषा, गणित आणि इंग्रजी विषय अध्ययनस्तर निश्चित करणे.
- वर्ग निहाय व स्तर निहाय माहितीचे विश्लेषण करणे.
- अध्ययनस्तर निहाय विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे.
- माहितीच्या विश्लेषण आधारे भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाचा कृती कार्यक्रम निश्चित करणे.
- विद्यार्थ्यांनी भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाचा उच्चतमस्तर गाठण्यासाठी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे.
स्वरूप
- सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इ. 2 री ते 8 वी तील सर्व विद्यार्थी सदर कार्यक्रमामध्ये समाविष्ट असणार आहेत.
- सदर कार्यक्रमामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे.
- भाषा विषय स्तर - प्रारंभिक स्तर, शब्द स्तर, वाक्य स्तर, उतारास्तर, वाचनगती आणि श्रुतलेखन.
- गणित विषय स्तर - प्रारंभिक, संख्यावाचन, संख्यालेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि अपूर्णांक बेरीज-वजाबाकी.
- इंग्रजी विषय स्तर - Beginner level, Word reading, sentence reading, Paragraph reading.
- वर्गशिक्षक/विषय शिक्षक हे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करतील.
- वर्गशिक्षक/विषय शिक्षक अध्ययन स्तर निश्चितीच्या माहितीवरून कृती कार्यक्रम तयार करतील.
- विद्यार्थ्यांनी भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाचा उच्चतमस्तर गाठण्यासाठी शिक्षक कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करतील.
पुढील पृष्ठ